CRPF : केंद्रीय राखीव पोलिस दलात कॉन्स्टेबल पदासाठी पदभरती, लगेच करा अर्ज !

WhatsApp Group Join Now
Spread the love

CRPF : केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये कॉन्स्टेबल पदाच्या 169 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, मोठी भरती सुरू झाली असून सदर पदांकरिता आवश्यक पात्रता धारक उमेदवारांकडून विविध कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Central Reserve Police Force Recruitment For Constable Post , Number of Post Vacancy – 169 ) पदे , पदांची संख्या आवश्यक पात्रता यासंदर्भातील सविस्तर मेगा भरती संदर्भातील माहिती जाहिरातीमध्ये पाहूयात :

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यामध्ये कॉन्स्टेबल ( GD ) खेळाडू पदांच्या एकुण 169 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे . ( Recruitment For Constable Post , Number of Post Vacancy – 169 )

आवश्यक पात्रता ( Qulification ) : या पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे , तसेच राष्ट्रीय चॅम्पियनशिप मध्ये राज्य किंवा देशाचे प्रतिनिधीत्व केलेले / A11 मध्ये त्यांच्या विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व केलेले / राज्य शालेय संघाचे प्रतिनिधीत्व केलेले खेळाडू असणे आवश्यक असणार आहे .

वयोमर्यादा ( Age Limit ) : या पदांकरीता उमेदवाराचे दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहे , यामध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 10 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 08 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : खालील जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://recruitment.crpf.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 15.02.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिय करिता जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 100/- रुपये तर मागास / महिला प्रवर्ग करीता फीस आकारली जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पहा

जाहीरात पहा

हे पण वाचा : एनएलसी इंडीयामध्ये विविध पदांच्या तब्बल 632 जागांसाठी मेगाभरती , लगेच करा अर्ज !

Leave a comment