MPCB : महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळामध्ये विविध पदांच्या तब्बल 64 जागांसाठी मेगा भरती , APPLY NOW !

WhatsApp Group Join Now
Spread the love

महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ मध्ये विविध पदांच्या तब्बल 64 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून मोठी भरती सुरू झाली असून सदर पदांकरिता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विविध कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Pollution Control Board , Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 64 ) पदे , पदांची संख्या आवश्यक अर्हता यासंदर्भातील सविस्तर मेगा भरती संदर्भातील माहिती जाहिरातीमध्ये पाहूयात :

पदाचे नावपदांची संख्या
प्रादेशिक अधिकारी02
वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी01
वैज्ञानिक अधिकारी 02
कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी04
प्रमुख लेखापाल03
विधी सहाय्यक 03
कनिष्ठ लघुलेखक14
कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक16
वरिष्ठ लिपिक10
प्रयोगशाळा सहाय्यक 03
कनिष्ठ लिपिक / टंकलेखक 06
एकुण पदांची संख्या64
शैक्षणिक पात्रता

आवश्यक शैक्षणिक पात्रता : पदवी / विज्ञान शाखेतील पदवी / विधी पदवी / इंग्रजी / मराठी शॉर्टहैंड / बी.एस्सी / टायपिंग पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे.

वयोमर्यादा : यासंदर्भात उमेदवाराचे दिनांक 01 डिसेंबर 2023 रोजीपर्यंत किमान वय 18 वर्षे तर कमाल वय हे 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहे , यांमध्ये मागास प्रवर्ग साठी वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद केल्याप्रमाणे पात्रता धारक उमेदवारांनी आपले अर्ज हे https://ibpsonline.ibps.in/mpcboct23/ या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक 19 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहे , सदर पदभरती करीता खुला प्रवर्ग 1000/- तर मागास प्रवर्ग / अनाथ प्रवर्ग करीता 900/- परीक्षा शुल्क तर दिव्यांग / माजी सैनिक यांकरिता फीस आकारली जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पहा

जाहीरात पहा

Leave a comment