महाराष्ट्र राज्य कारागृह विभागामध्ये पुणे येथे विविध पदांसाठी मेगाभरती , लगेच करा अर्ज !

WhatsApp Group Join Now
Spread the love

महाराष्ट्र राज्य कारागृह विभाग , पुणे येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, मोठी भरती सुरू झाली असून सदर पदांकरिता आवश्यक पात्रता धारक उमेदवारांकडून विविध कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे . (  Maharashtra Prisons Department Recruitment For Various Post , Number of Post Vacnacy – 225   ) पदे , पदांची संख्या आवश्यक पात्रता यासंदर्भातील सविस्तर मेगा भरती संदर्भातील माहिती जाहिरातीमध्ये पाहूयात :

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यामध्ये लिपिक पदांच्या 125 जागा , वरिष्ठ लिपिक – 31 , लघुलेखक निम्न श्रेणी – 04 , मिश्रक – 27 , शिक्षक – 12  , शिवणकाम निदेशक – 10  , सुतारकाम निदेशक – 10 , प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 08 , बेकरी निदेशक – 04 , ताणाकार – 06 , विणकाम निदेशक – 02 , चर्मकला निदेशक – 02 , यंत्रनिदेशक – 02 , मिटींग आणि विव्हिंग निदेशक – 01 , करवत्या – 01 ..

लोहारकाम निदेशक – 01 , कातारी – 01 , गृह पर्यवेक्षक – 01 , पंजा व गालीचा निदेशक – 01 , ब्रेललिपि निदेशक – 01 , जोडारी – 01 , प्रिपेटरी – 01 , मिलिंग पर्यवेक्षक – 01 , शारीरिक कवायत निदेशक – 01 , शारीरिक शिक्षण निदेशक – 01 अशा एकुण 255 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .

हे पण वाचा : इंडियन रेल्वे मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

आवश्यक शैक्षणिक पात्रता ( Education Qulification ) : या पदांकरीता उमेदवार हे पदवी / 12 वी / 10 वी / आयटीआय किंवा संबंधित पदांनुसार आवश्यक प्रमाणपत्र / डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .

वयोर्मादा ( Age Limit ) :  या पदांकरीता उमेदवाराचे दिनांक 01 जानेवारी 2024 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहे . यामध्ये माजी सैनिक उमेदवारांसाठी वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : या जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले अर्ज हे https://cdn3.digialm.com/EForms/ या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक 25 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहे . सदर पदभरती प्रक्रिये करिता खुला प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर मागास प्रवर्ग / आदुघ करीता 900/- रुपये तर माजी सैनिक करीता फीस आकारली जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पहा

जाहीरात पहा

Leave a comment