पुण्यामध्ये लिपिक ,फायरमन ,स्वयंपाकी , शिपाई , आयटीआय पदे इ. पदांसाठी सरकारी नोकरीची पर्मनंट संधी !

WhatsApp Group Join Now
Spread the love

राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी पुण्यामध्ये लिपिक फायरमन , स्वयंपाकी , शिपाई , आयटीआय पदे इ. पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, मोठी भरती सुरू झाली असून सदर पदांकरिता आवश्यक पात्रता धारक उमेदवारांकडून विविध कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे . ( National Defence Academy Kaadakwasla Pune Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 198  ) पदे , पदांची संख्या आवश्यक पात्रता यासंदर्भातील सविस्तर मेगा भरती संदर्भातील माहिती जाहिरातीमध्ये पाहूयात :

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यामध्ये कनिष्ठ लिपिक , स्टेनोग्राफर – II , ड्राफ्ट्समन , सिनमा प्रोजेक्शनिस्ट II , स्वयंपाकी , वाहनचालक , कारपेंटर , फायरमन , बेकर आणि कन्फेक्शनर , सायकल रिपेरर , प्रिंटिंग मशीन ऑपरेटर , बूट रिपेरर , कार्यालयीन स्टाफ कर्मचारी अशा एकुण 198 जागांसाठी पद भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे  .

हे पण वाचा : Pune Municipal Corporation Recruitment : पुणे महानगरपालिका 113 जागांसाठी पदभरती ,अर्ज करण्याची शेवटची दिनांक 05.02.2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता( Education Qulification ) : सदर पदांसाठी उमेदवार हे इयत्ता 10 वी / 12 वी /संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय डिप्लोमा / प्रमाणपत्र / टायपिंग / स्टेनो पात्रता / वाहन चालविण्याचा परवाना अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले अर्ज हे https://ndacivrect.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक 16 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहे , सदर पदभरती प्रक्रिये करिता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पहा

येथे क्लिक करा जाहिरात पहा

Leave a comment