बँकेत लिपिक,शिपाई ,वाहन चालक,सुरक्षा रक्षक पदांसाठी मोठी भरती , लगेच करा अर्ज !

WhatsApp Group Join Now
Spread the love

सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक मध्ये लिपिक ,शिपाई , वाहन चालक ,सुरक्षा रक्षक पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, मोठी भरती सुरू झाली असून सदर पदांकरिता आवश्यक पात्रता धारक उमेदवारांकडून विविध कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे . ( Solapur Zilha Nagari Sahakari Bank Recruitment For Various Post , Number of Post Vacancy -Not Declead  ) पदे , पदांची संख्या आवश्यक पात्रता यासंदर्भातील सविस्तर मेगा भरती संदर्भातील माहिती जाहिरातीमध्ये पाहूयात :

01.लिपिक ( Clerk ) : लिपीक पदांसाठी उमेदवार हे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे , तसेच एम एस सीआयटी किंवा समतुल्य प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .तसेच सदर पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय हे 22 वर्षे तर कमाल वय हे 34 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहे .

02.शिपाई ( Peon ) : शिपाई पदांसाठी उमेदवार हे किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे , तसेच उमेदवाराचे किमान वय हे 25 वर्षे तर कमाल वय हे 40 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहे .

03.वाहन चालक ( Driver ) : या पदांसाठी उमेदवार हे किमान 8 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे तसेच चारचाकी वाहन चालविण्याचा परवारना असणे आवश्यक असणार आहे . उमेदवाराचे किमान वय हे 25 वर्षे तर कमाल वय हे 40 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहे.

04.सुरक्षा रक्षक ( Security Guard ) :या पदांसाठी उमेदवार हे इयत्ता 7 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे , तसेच उमेदवाराचे किमान वय हे 21 वर्षे तर कमाल वय हे 45 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहे .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्‍क : या जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे http://surbanksassociation.com/index.php या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक 05 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करावयाचा आहे . या पदभरती प्रक्रिया साठी1180/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पहा

जाहीरात पहा

Leave a comment